माध्यम स्वातंत्र्यावरील आक्रमणाइतकाच माध्यमांचा सवंगपणा हाही गंभीर प्रश्न आहे!
माध्यमांचं स्वातंत्र्य आणि पत्रकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर खूप लिहिलं जातंय. फॅसिझमच्या आक्रमण काळात ते चर्चिलं जाणं गरजेचं आहे. ‘माध्यमांना काय करू दिलं जात नाही’, ही बातमी बनते किंवा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाची घटना म्हणून त्याकडे पाहिलं जातं. ‘माध्यमं काय करत नाहीत’, याबद्दल मात्र माध्यमांमध्ये सार्वत्रिक एकमतानं मूग गिळून पाळलेली शांतता अवतीभवती दिसते. ती शांतता भंग पावो.......